Home प्रादेशिक विद्यार्थ्यांसाठी विशेष करिअर मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन

विद्यार्थ्यांसाठी विशेष करिअर मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन

0
9

गडचिरोली, ता. १३: ॲड. दुष्यंत नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विशेष करिअर मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आरमोरी रोडवरील आर. के. सेलिब्रेशन हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे.

मा. प्रा. डॉ. विनोद बाबर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या सोहळ्यात विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी, स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण तसेच शासकीय व खासगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भविष्यातील करिअरची योग्य निवड करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींची माहितीही विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक भवितव्याच्या दृष्टीने हा मार्गदर्शन सोहळा उपयुक्त ठरणार असून, गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक ॲड. दुष्यंत नामदेव किरसान मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here